२९
१ मग पलिष्ट्यांनी आपली लर्व सैन्ये अफेक तेय़ें एकत्र जमवली, आणि इस्त्राएली माणसांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली. २ आणि पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासुध्दां व हजांरांसुध्दा पुढे चालले, आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसें आखीशाबरोबर चालली. ३ तेव्हां पलिष्ट्यांचे सरदार बोलले, हे इब्री येथें काय करतात? मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, इस्त्राएलाचा राजा षौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ कांही दिवस किंवा कांही वर्षे राहिला आहे,आणि तो माझ्याकडे फितला त्या दिवसापासून आजपर्यत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही. ४ मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्य्ट्यांचे सरदार त्याला म्हणाले,जे ठिकाण तूं या माणसाला नेमून दिलें येथे त्याच्या ठिकाणी त्यानें जावें म्हणून त्याला परत जाण्यास लाव.; त्यानें आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशानें समेट करील बरे? या मनुष्याच्या शिरांनी की नाही? ५ शौलानें हजारांना मारलें व दावीदाने दहा हजारांना मारले असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले तो हाच दावीद आहे कीं नाही? ६ मग आखीशानें दावीदाला बोलानून त्यीला म्हटलें, यहोवा जिवंत आहे; तूं सरपणानें वागला आहेस, व माझ्याबरोबर सैन्यात तुझें बाहेर निघून जाणें व तुझें आंत जेणे माझ्या दृष्टीनें बरे आहे,, आणि तूं माझ्याजवळ आला, त्या दिवसापासून आजपर्यत तुझ्याठायी काहीं वाईट मला सांपजलें नाही, तथापि तूं सरदारांच्या मनास येत नाहीस. ७ तर तू पलिष्यांच्या सरदारांना असंतुष्ट करू मये म्हणून आतां शांतीनें निघून परत जा. ८ तेव्हां दावीद आखीशाला म्हणाला, मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे?आणि मी तुझ्यापुढें आलों त्यादिवसापासून आज पर्यततुला आपल्या दासाच्याठायी काय सांपडले आहे? ९ तोव्हां आखीशाने दावीदाने उत्तरदेऊन म्दटले, तूं माझ्या दृष्टानें देवाच्या दबतासारखा चांगला आहेस असें मी जाणतो, परंतु ,त्यानें आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असें पलिष्ट्यांचे सरदार म्ङणाले आहेत. १० तर आतां तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्याच्यांयहित तूं पहाटेस ऊठ, आणि तुम्ही पहाटेस उठल्यावर तुम्हांला उजेड झाला म्हणजे जा. ११ मग पलिष्यांच्या देशांत परत जाण्यास दावीद व त्याचीं माणसें मोठ्या पहाटेस उठली; आणि पलिष्टी वर इज्रेल य़ेथे गेले.