६
१ आणि देवाचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला. २ आण पलिष्ट्यांनी याजकांना व दैवप्रश्र्न पाहणाऱ्यांना बोलावून त्यांनै म्हटलें, यहोवाच्या कोशाचें आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा. ३ तेव्हां ते बोलले, तुम्ही इस्त्राएलाच्या देवाचा कोश माघारा पाठवाल तर तो रिकामा पाठवू नका,तर त्याबरोबर दोषांकरिता अर्पण अवश्य पाठवावे, म्हणजे तुम्हीव निरोगी व्हाल;आणि त्याचा हात तुम्हावरून का दूर दोत नाही हें तुम्हास माहित होईल. ४ तेव्हां हे म्हणाले,जे दोषाकरिता अर्पण त्याबरोबर आम्ही पाठवायचे ते काय असावे? आणि ते बोलले ,पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्ये प्रमाणे पाच सोन्याचे मूळव्याधीचे मोड व पांच सोन्याचे उंदीर ; कारण तुम्हा सर्वावर व तुमच्या सरदारांवर एकच पीडा आली होती. ५ म्हणून तुम्ही तुमच्या मूळव्याधीच्या मोडांच्या मूर्ती व तुमते जे उंदीर शेताचा नांश करतात त्याच्या मूर्ति करा, आणि तुम्ही इस्त्राएलाच्या देवाला मान द्या. म्हणजे कदाचित तो आपला हात तुम्हावरून व तुमच्या देवावरून व तुमच्या शेतावरून हलका करील. ६ तर मिसरी व फारो यांनी जशी आपली द्रदये कठाण केली तशीं तुम्ही आपली ह्रदये कश्याल कठीण करता?त्याने त्यांत्यामध्ये अद्भत कृत्यें केल्यावर त्यांनी त्यांना जाऊ दिले नाही काय? ७ तर ता एक नवी गाडी घेऊन तयार करा, आणि ज्यांवर जूं कधी चढले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा, व त्यांची वासरे त्याच्यापासून वेगळी करून घरी आणा. ८ मग यहोवाचा कोश घेऊन गाडीवर ठेवा, आणि जे , सोन्याचे दागिने तुम्ही दोषांकरितां अर्पण म्हणून पाठवून द्या. ९ आणि पाहा,बेथ- शेमेशाकडे त्याच्या सीमेच्या मार्गाने तो गेला तर त्यानें आम्हाला हें मोठे अरिष्ट लावलें आहे, जर गेला नाही, तर त्याच्या हातानें आम्हाला मारलें नाहीं, जें आम्हाला घडलें ते दैवानें घडले असें आम्ही समजूं. १० मग त्यामाणसांनी तसे केले,म्हणजे त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या,आणि त्यांची वासरें घरी बांधून ठेवली. ११ मग त्यांनी यहोवाचा कोश आणि तो डब्बा, सोन्याचे उंदीर व त्यांच्या मबळव्याधीच्या मोडांच्या मूर्ति येसुध्दा,गाडीत ठेवला. १२ मग गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्यानें गेल्या; त्या मोठ्या मार्गानें जाताना हंबरत चालत्या, उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहींत;आणि पलिष्ट्यांचे सरदार बेथ-शेमेशाच्या सीमेपर्त त्यांच्यामागें गेले. १३ तेव्हां बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला तेव्हां तो पाहून ते आनंद पावले. १४ मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशाकर चयाच्या शेतांत येऊन जेथें एक मोठा दगड होता तेथें उभी राहिली; आणि त्यांनी गाडीचीं लाकडे तोहन गायी यहोवाला होमार्पण अशा अर्पण केल्या. १५ आणि लेव्यांनी, यहोवाचा कोश व त्याबरबरचा ज्यांत सोन्याचे दागिने होते तो डबा हे उतरून त्या मोठ्या दगडावर ठेवले, आणि बेथ-शेमेशाच्या माणसांनी त्या दिवशी यहोवाला होमार्पणें व यज्ञ अर्पण केले. १६ आणि हें पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच द्वशी एक्रोनास परत गेले. १७ आणि जे सोन्याच्या मूळव्याधीचे मोड पलिष्यांनी यहोवाला दोषांकरितां अर्पण म्हणून पाठवले ते हे:अश्दोदकरितां एक,गज्जकरितां एक,अश्कलोनाकरितां एक ,गथाकरिता एक,एक्रोनाकरिता एक, १८ आणि आबेलाचा मोठा दगड ज्यावर त्यांनी यहोवाचा कोश ठेवला, तेथपर्यत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीहि, त्या पांच सरदांची होती,त्यांच्या संख्येच्याप्रमाणाने ते सोन्याचे उदीरहोते; तो दगड आजपर्यत यहोशवा बेथ-शएमेशकर यांच्या शेतात आहे. १९ मग त्यानें बेथ-शेमेशाच्या मनुष्यांना मारलें, कारण त्यांनी यहोवाच्या कोशाच्या आंत पाहिलें होतें; त्याने लोकांतील पन्नास हजार आणि सत्तर जण हाणले, आणि यहोवानें लोकांना मोठ्या वधानें हाणलें, यामुळे लोकांनी शोक केला. २० तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, हा पवित्र देव यहोवा याच्यासमोर कोणाच्यानें उभे राहवेल? त्याने आम्हांपासून वरती कोणाकडेजावे? २१ मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटलें की,पलिष्यांनी यहोवाचा कोश माघारा आणला आहे, तुम्ही खाली येऊन तो आपणांकडे वरतीं न्या.