15
रोमी सुभेदार पिलात यानासमोर येशु
(मत्तय २७:१,२; २७:११-१४; लूक २३:१-५; योहान १८:२८-३८)
मंग पहाट व्हताच वडील लोक अनी शास्त्री यासनासंगे मुख्य याजक अनी सर्व यहूदी महासभा यासनी निर्णय लिसन, येशुले बांधीन पिलातना स्वाधीन करं.
तवय पिलातनी त्याले ईचारं, “तु काय यहूद्यासना राजा शे?” येशुनी त्याले उत्तर दिधं, “तु म्हणस तसच.”
मुख्य याजकसनी त्यानावर बराच गोष्टीसना आरोप करा. पिलातनी त्याले परत ईचारं, “तुले काहीच नही बोलानं का? दख, त्या तुनावर कितल्या गोष्टीसना आरोप करी राहीनात!”
तरी येशुनी काहीच उत्तर दिधं नही, यावरतीन पिलातले आश्चर्य वाटनं.
मृत्यदंडनी आज्ञा
(मत्तय २७:१५-२६; लूक २३:१३-२५; योहान १८:३९-४०; १९:१-१६)
प्रत्येक वल्हांडण सणना दिनमा यहूदी लोकसनी मागणी करेल एक कैदीले तो त्यासनाकरता सोडी दे, अशी पिलातनी सवय व्हती. तवय रोमी सरकारविरोध्द व्हयेल बंडखोरीमा ज्यानी खुन करेल व्हता असा बरब्बा नावना एक माणुस बंडखोरससंगे कैदखानामा व्हता. मंग लोकसमुदाय पिलातकडे ईसन तुम्हीन तुमना रितप्रमाणे आमनाकरता करा, अस त्याले सांगु लागणात. पिलातनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता यहूद्यासना राजाले सोडानं अशी तुमनी ईच्छा शे का?” 10 मुख्य याजकसले त्याना हेवा वाटी राहींता म्हणीन त्याले सोपी देयल व्हतं, हाई पिलातले समजनं व्हतं.
11 पण मुख्य याजकसनी लोकसले चिंगाडीन हाई मागणी कराले लाई की, त्यानापेक्षा आमनाकरता बरब्बाले सोडी द्या. 12 तवय पिलातनी त्यासले परत ईचारं, “तर मंग ज्याले तुम्हीन यहूद्यासना राजा म्हणतस् त्यानं मी काय करू?”
13 त्या परत वरडीन बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”
14 पिलातनी त्यासले ईचारं, “का बरं, त्यानी काय गुन्हा करेल शे?” पण त्या आखो वरडीन बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”
15 तवय लोकसले खूश कराकरता पिलातनी बरब्बाले सोडी दिधं अनी येशुले फटका मारीसन क्रुसखांबवर खियाकरता त्यासनाच आंगे लाई दिधं.
शिपाई येशुनी थट्टा करतस
(मत्तय २७:२७-३१; योहान १९:२,३)
16 मंग शिपाई येशुले प्रयतोर्यममा म्हणजे राज्यपालना घरनं आंगनमा लई गयात अनी त्यासनी सर्व रोमी शिपाईसले एकत्र बलायं. 17 नंतर त्यासनी येशुना आंगवर जाभंया कपडा घालात, काटेरी झुडूपना मुकूट बनाडीसन त्याना डोकामा घाला. 18 अनी त्या त्याले वंदन करीसन बोलू लागणात, “हे यहूद्यासना राजा, तुना जयजयकार असो!” 19 त्यासनी त्याना डोकावर वेतना शेमटीघाई मारं, त्यानावर थुंकनात अनी गुडघा टेकीन त्याले नमन करं. 20 अशी थट्टा करावर त्यासनी जाभंया कपडा त्याना आंगवरतीन काढीन त्याले त्याना कपडा परत घाली धिदात. मंग क्रुसखांबवर खियाकरता त्याले बाहेर लई गयात.
येशुले क्रुसखांबवर खियतस
(मत्तय २७:३२-४४; लूक २३:२६-४३; योहान १९:१७-२७)
21  १५:२१ रोम १६:१३तवय अलेक्सांद्र अनी रूफ यासना बाप शिमोन कुरेनेकर शेतमातीन ईसन त्यासना जोडेतीन जाई राहींता तवय येशुना क्रुसखांब उचलाकरता त्याले सैनिकसनी जबरदस्ती करी. 22 मंग त्या येशुले गुलगुथा म्हणजे “कवटीनी जागा” आठे लयनात. 23 अनी त्याले कडु मसाला मिसाळेल द्राक्षरस पेवाले दिधा, पण त्यानी तो पिधा नही. 24 तवय त्यासनी त्याले क्रुसखांबवर खियं अनी चिठ्या टाकीन त्याना कपडा वाटी लिधात. 25 त्यासनी त्याले क्रुसखांबवर खियं तवय सकायना नऊ वाजेल व्हतात. 26 त्याना डोकानावर क्रुसखांबले त्यासनी “यहूद्यासना राजा” असा दोषपत्रना लेख लायेल व्हता. 27 त्यासनी त्यानासंगे दोन लुटारूसले, एकले उजवीकडे अनी एकले डावीकडे अस क्रुसखांबवर खियं. 28 “अनी अपराधीसमा त्यानी गणना व्हयनी, हाई शास्त्रवचन पुर्ण व्हयनं.”
29  १५:२९ मार्क १४:५८; योहान २:१९मंग तठेन ये जा करणारसनी डोका हालाईन त्यानी अशी निंदा करी की, “अरे! मंदिर मोडीन तीन दिनमा बांधणारा! 30 स्वतःले वाचाड, क्रुसखांबवरतीन खाल ये!”
31 असच मुख्य याजक बी शास्त्रीससंगे आपसमा थट्टा करीसन बोलणात, त्यानी दुसरासनं तारण करं अनी त्याले स्वतःलेच वाचाडता येत नही!
32 इस्त्राएलसना राजा ख्रिस्त, यानी आते क्रुसखांबवरतीन खाल उतरीन दखाडावं म्हणजे ते दखीसन आम्हीन ईश्वास धरसुत! अनी त्यानासंगे ज्यासले क्रुसखांबवर चढायेल व्हतं त्यासनी पण त्यानी निंदा करी.
येशुना मृत्यु
(मत्तय २७:४५-५६; लूक २३:४४-४९; योहान १९:२८-३०)
33 दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता. 34 दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
35 तवय ज्या जोडे उभा व्हतात त्यासनापैकी काही जणसनी ऐकीन सांगं, “दखा, तो एलियाले बलाई राहिना!” 36 तवय एकजणनी पयत जाईसन आंबमा स्पंज बुडाईन तो वेत नावना वनस्पतीना काठीवर ठिसन त्याले चोखाले दिधा अनी बोलणा, “राहु द्या! एलिया याले क्रुसखांबवरतीन खाल उताराले येस का नही हाई दखुत!”
37 मंग येशुनी मोठी आरोळी मारीन जीव सोडा.
38 तवय मंदिरमधला पडदाना वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात. 39 मंग त्यानी आपला जीव कसा सोडा हाई त्यानापुढे जोडेच उभा राहेल अधिकारी दखीन बोलना, “खरोखरंच हाऊ माणुस देवना पोऱ्या व्हता!”
40  १५:४० लूक ८:२,३काही बाया दुरतीन दखी राहित्यांत त्यासनामा मरीया मग्दालीया, धाकला याकोब अनी योसे यासनी माय मरीया अनी सलोमे ह्या व्हतात. 41 तो गालीलमा व्हता तवय ह्या त्यानामांगे चालेत अनी त्यानी सेवा करेत. आखो बऱ्याच बाया व्हत्यात ज्या त्यानासंगे यरूशलेमले येल व्हत्यात.
येशुले कबरमा ठेवतस
(मत्तय २७:५७-६१; लूक २३:५०-५६; योहान १९:३८-४२)
42 तवय संध्याकाय व्हयनी, हाऊ तयारीना म्हणजे यहूदीसना शब्बाथ दिनना आदला रोज व्हता, 43 म्हणीन अरिमथाई गावना योसेफनी हिम्मत करीसन पिलातकडे जाईन येशुनं शरीर मांगं; तो महासभाना एक प्रतिष्ठीत सभासद व्हता अनी स्वतः देवनं राज्य येवानी वाट दखी राहींता. 44 तो इतलामा कसा मरना यानं पिलातले नवल वाटनं; अनी त्यानी सुबेदारले बलाईन ईचारं, “तो मरी जायेल शे का?” 45 सुबेदारकडतीन खात्री करी लेवानंतर त्यानी योसेफले प्रेत दिधं. 46 त्यानी तागना कपडा ईकत आणात अनी त्याले खाल उतारीसन त्या कपडामा गुंढाळं; मंग त्याना शरिरले खडकमा बनाडेल कबरमा ठेवं अनी कबरना तोंडवर भली मोठी धोंड लाई दिधी. 47 त्यानं शरीर कोठे ठेयल शे हाई मरीया मग्दालीया, योसेनी माय मरीया यासनी दखं.

15:21 १५:२१ रोम १६:१३

15:29 १५:२९ मार्क १४:५८; योहान २:१९

15:40 १५:४० लूक ८:२,३