१५
१ आणि शमुवेल शौलाला म्हणाला, यहोवानें आपले लोक इस्त्राएल यांच्यावर तूं राजा व्हावें म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवलें, तर आतां तूं यहोवाची वचनें ऐक. २ सैन्यांचा यहोवा असें म्हणतो, इस्त्राएल मिसरातून वर येत असतां अमालेकानें त्यासा काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्याविरुध्द कसा उभा राहिला हें मी पाहिलें आहे. ३ आतां तूं जाईन अमालेकाला मार, आणि त्यांचें जें आहे त्या सर्वांचा नाश कर, त्यांना सोडूं नको, तर पुरुष व बाया, लेकरूं व तान्हें व गुरें व मेंझरें व उंट व गाढव यांना जिवें मार. ४ मग शौलानें लोकांना बोलावून तेलाईमांत त्यांची नोंद घेतली; तेदोन लक्ष सायदळ होते व यहूदातील माणसें दहा हजार होती. ५ मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका ओढ्यांत दबा धरून राहिला. ६ तेव्हां शौलानें केनी यांना म्हटले,ओमालेक्यांबरोबर तुम्हांस मारूं नये म्हणून तुम्ही त्याच्यांमधून निघून जा. तेव्हां केनी अमालेक्यांमधून निघून गेले. ७ मग शौलानें हवीला पासून मिसरासमोरील शूरापर्यत अमालेक्यांना मार दिला. ८ आणि त्यानें अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरलें, आमि त्या सर्व लोकांस तरवारीच्या धारेखाली जिवें मारले. ९ तथापि शौलानें व लोकांनीं अगागला जिवंत ठेवले, त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंती जें कांही चांगले तें राखून ठेवलें, त्यांचा अगदीच नाश केला नाहीं; करंतु जें फुसकें नासकें होतें त्या सर्वाचा त्यांनी अगदीच नाश केला. १० तेव्हां यहोवाचें वचन शमुवेलाकडे आले, ते म्हणालें, ११ मी शौलाला राजा होण्यास स्थापलें यावरून मला अनुताप झाला, कारण तो मला अनुसरण्याचें सोडून मागे फिरला आहे,आणि त्यानें माझ्या आज्ञा आचारल्या नाहीत.मग शमुवेलाला खेद झाला, आणि त्यानें सारी रात्र यहोवाला आरोळी केली. १२ आमि शमुवेल शौलाला भेटायला सकाळी उटला, तेव्हां कोणीं शमुलेलाला सांगितले कीं शौल कर्मेलास आला होता आणि पाहा, आपणासाठीं स्तंभ उभारून परतला व खाली गुलगालास गेला आहे. १३ मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौलानें त्याला म्हटलें,यहोवाकडून तूं आशीर्वादित हो:मी यहोवाची आज्ञा आचरली आहे. १४ तेव्हां शमुवेल म्हणाला,तर मेढरांचें ओरडणें माझ्या कानी पडतें व गुरांचे हंबरणे मी ऐकतो तें काय आहे? १५ मग शौल म्ङणाला, लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली, कारण त्यांनी मेंझरे व गुरे यातली उत्तम ती यहोवा तुझा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखली; पण आम्ही वरकडांचा नाश केला. १६ तेव्हां शमुवेलानें शौलाला म्हटलें,तूं थांब, म्हणजे ह्या गेल्या रात्री यहोवानें मला काय सांगितलेंते मी तुला संगतो. आणि त्याने त्याला म्हटले,सांग. १७ मग शमुवेल म्हणाला, तूं आपल्या दृष्टीनें लहान होतास तेव्हां तुला इस्त्राएलाच्या वंशाचा मुख्य करण्यांत आले नाही कायय़ १८ आणि यहोवानें तुला मारिगावर पाठवून सांगितलें की, जा, त्या पापिष्ट अमालेक्यांचा नाश कर, ते नाहीसे होईपर्यत त्याच्यांशी लढाई कर. १९ तर मग तूं यहोवाचे वचन कां मानले नाहीं?तूं तर लुटीवर झडप घालून यहोवाच्या दृष्टीनें जे वाईट तें केले. २० तेव्हां शौल समुवेलाला म्हणाला,मी यहोवाचे वचन मानले व ज्या मार्गावर यहोवानें मला पाठवलें त्यात मी चाललो, आणि अमालेक्यांचा नाश करून अमालेकाचा राजा अगाग याला मी घेऊन आलो आहें. २१ परंतु ज्यांचा नाश करायचा होता अशी जीं तुटीची मेंढरे व गुरे त्यातलीउत्तम ती लोकांनी यहोवा तुझादेव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठीं घेतली. २२ शमुवेल म्हणाला, यहोवाला आपलें वचन मानण्यानें जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणांनी व यज्ञांनी होईल काट? हापा, यज्ञापेक्षां आज्ञा मानणें आणि मेंढराच्या मांद्यांपेक्षां वचन ऐकणें अधिक चांगले आहें. २३ कारण अवज्ञा जादुगिरीच्या पापासारखी आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व मूर्ति करणे यासारखा आहे; तूं यहोवाचें वचन धिक्कारलें, यामुळें राज्य करण्याविषयी त्यानें तुला धिक्कारलें आहे. २४ मग शौल शमुवेलाला म्हणाला, मी पाप केलें आहे कारण मी यहोवाची आज्ञा व तुझी वचनें यांचे उल्ल्घन केलें; ते यामुळें कीं लोकांचे भय धरून मी त्यंचें वचन मानलें. २५ तर मी तुला विनंती करतों, माझ्या पापीची क्षमा कर; आणि मीं यहोवाचें भजनपूजन करावें म्हणून माझ्याबरोबर परत ये. २६ आणि शमुवेल शौलाला म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, कारण तूं यहोवाचें वचन धिक्कारले, आणि यहोवानें तुला इस्त्राएलावर राज्य करण्यविषटीं धिक्कारलें आहे. २७ आणि शमुवेल जायला वळला तेव्हां शौलानें त्याच्या झग्याचा कांठ धरला व तो फाटला. २८ तेव्हां शमुवेलानें त्.ला म्हटले, यहोवानें आज इस्त्राएलाचें राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शएजारी जो तुझ्यापेक्षां बरा त्याला दिलें आहे. २९ आणि इस्त्राएलाचा विजय, तो तर लबाजी करणार नाही, किंवा अनुतापणार नाही, कारण अनुतापायला तो मनुष्य नव्हे. ३० तेव्हां शोल म्हणाला, मी पाप केलें आहे, तरी आतां मी तुला विनंती करतो, माझ्या लोकांच्या वडिलांसमोर व इस्त्राएलासमोर तूं माझा सत्कार कर,आणि यहोवा तुझा देव याचें भजनपूजन मी करावे म्हणून माझ्याबरोबर परत ये. ३१ मग शमुवेल वळून शौलाच्या मागें आला, आणि शौलानें य़होवाचें भजनपूजन केलें. ३२ मग शमुवेल म्ङाला अमालेक्यांता राजा अगाग याला माझ्याकडे आणा. तेव्हां अगाग डौलानें त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले, खचित मरणाचें कडूण निघून गेलें आहे. ३३ तेव्हा शमुवेल म्हणाला जसें तुझ्या तरवारीने बायकांना बालकांविरहित केलें आहे तशीबायकांमध्यें तुझी आई बालकाविरहित होईल. मग शमुवेलानें गिलगालात यहोवाच्या समोर अगागाचे तुकडे तुकडे केले. ३४ त्यानंतर शमुवेल रामा येथें गेला, आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिब्यास गेला. ३५ आणि शमुवेल आपल्या मरणाच्या दिवसापर्यत शौलाला भेटायला आणखी गेला नाही; तरी शमुवेलानें शौलासाठी शोक केला; आणि आपण शौलाला इस्त्राएलांवर राजा केलें म्ङणून यहोवा अनुतापला.