१४
१ दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही. २ परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात. ३ परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता. ४ दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला. दुष्टांना देव माहीत नाही. त्यांच्याकडे खायलाखूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत. ५ त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. ६ परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते. ७ सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.